जेजुरीत भीषण रस्ते अपघात; तिघांचा दुर्दैवी मृत्यू; गावात हळहळ, शोकाकुळ वातावरण
जेजुरी: पुण्यातील एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर बेलसर फाटा येथे एका एसटी बस आणि दुचाकी वाहनामध्ये गंभीर अपघात झाला आहे. हा अपघात १६ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता घडला. या अपघातात दुचाकीवर स्वार असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्तींची नावे रमेश किसन मेमाणे (वय ६०), संतोष दत्तात्रय मेमाणे (वय ४०), आणि पांडुरंग दामोदर मेमाणे (वय ६५, तिघेही बोरमाळ वस्ती, पारगाव मेमाणे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे) अशी आहेत.
याबद्दल अधिक माहिती अशी आहे की सासवड-जेजुरी रोड (पालखी महामार्ग) वर बेलसर फाटा भागात फ्लायओव्हर चे काम सुरू आहे. एका दुचाकीवर तीन लोक रस्ता ओलांडत होते. यादरम्यान एसटी बसने तिघांना जोरदार धडक दिली. एसटीच्या चालकाने वाहनाची गती कमी करून बसला रस्त्याच्या बाजूला नेण्याचा खूप प्रयत्न केला.
हे देखील वाचा: चाकण-शिक्रापूर रोडवर कंटेनरने केलेली भीषण दुर्घटना
गावावर शोककळा
तथापि, बसखाली पडल्याने दुचाकी बराच अंतर घसरत गेली. परिणामी, या अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना त्वरित जेजुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी सांगितले की त्यातील तिघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. या अपघातात एका वस्तीतल्या तिघांचा मृत्यू झाल्यामुळे पारगाव मेमाणे गावात शोककळा आहे
झेंडवाडीनजीक अपघात
गेल्या काही दिवसांपूर्वी झेंडेवाडी नजीक एसटीने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली होती. या अपघातामध्ये दुचाकीवरील जेष्ठाचा जागीच मृत्यू झाला होता. ही अपघाताची घटना ताजी असतानाच आता आणखी एक अपघाताची घटना घडली आहे.












