पाबळमध्ये महिलेचा विनयभंग आणि पतीला मारहाण; शिरूर तालुक्यातील कन्हेरसर रोडवर घडलेली घटना
शिक्रापूर: कारने प्रवास करणाऱ्या दाम्पत्याला शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. ही घटना पाबळ (शिरूर) येथील कन्हेरसर रोडवर घडली. पीडित महिलेने याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी शुभम पोपट पिंगळे, अजित शिनलकर व एक अनोळखी युवक (सर्व रा. माळतळे पाबळ ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हे देखील वाचा: स्टारबक्स कॉफी लोगोचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?; आश्चर्यकारक प्रतीक आणि इतिहासाची कहाणी
माहिती नुसार, महिला आपल्या पतीसोबत कारमध्ये प्रवास करत होती. तेव्हा समोरून शुभम पिंगळे, अजित शिनलकर आणि त्यांचा एक मित्र दुचाकीवर ट्रिपल सीटवर येत होते. या दरम्यान, महिलेची कार रस्त्यावर आली तेव्हा तीन लोक समोरून आले आणि महिलेच्या पतीसोबत शिवीगाळ आणि छेडछाड करू लागले.
या दरम्यान, महिला आपल्या पतीला वाचवण्यासाठी गेली असता, तिघांनी महिलेची छेड काढली आणि तिला मारहाण केली. या वेळी महिलेच्या गळ्यातील साडेपाच तोळ्याचे मंगळसूत्र गायब झाले.











