ओतूरमध्ये बिबट्याला पकडण्यात वनविभागाचे यश; बाबीतमळा हल्ल्यानंतर लागलेले पिंजरे फळले, वनरक्षकांचे महत्वपूर्ण योगदान
ओतूर: ओतूरचे वन क्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली बाबीतमळा परिसरात ओतूर श्री कपर्दीकेश्वर मंदिराच्या मागे पिंपळगाव जोगे कालव्याजवळ पंधरा दिवसांपूर्वी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक नर बिबट्या अडकला आणि त्याला पकडण्यात आले. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बिबट्या कैद करण्यात आला. त्याचे वय अंदाजे सात वर्ष आहे, असे मानले जाते.
माहिती मिळताच सारिका बुट्टे वनपाल ओतूर, विश्वनाथ बेले वनरक्षक ओतूर, दादाभाऊ साबळे वनरक्षक उदापूर, किसन केदार, गणपत केदार, फुलचंद खंडागळे, गंगाराम जाधव,प्रदीप तांबे यांनी घटनास्थळी पोहोचून तपासणी केली आणि बिबट्याला माणिकडोह येथे नेले. बिबट्याला आश्रयकेंद्रात दाखल केले आहे. या कार्यात मनोहर जाधव, गणेश खंडागळे, पोपट मालकर, तुकाराम गीते, सुरत सावंत, वैभव अस्वार, गणेश गीते, रमेश गीते, संदीप गीते, दीपक घुले, संपत पानसरे आणि इतर गावकऱ्यांनी सहकार्य केले.
हे देखील वाचा: जखमी तरसाला वन विभागाने वाचवले, नवजीवन मिळाले; धोलवडच्या भवानीनगर येथे वन विभागाचे यशस्वी बचावकार्य
आपले काम करताना आणि स्वतःची काळजी घेताना, बिबट परिसरातून जाताना तुमच्या वाहनाचा हॉर्न जोरात वाजवा, जेणेकरून रस्त्याच्या कडेला लपलेले वन्य प्राणी आपले ठिकाण बदलतील आणि तुम्ही सुरक्षित राहाल. शालेय मुलांनी शाळेत येताना-जाताना गटांत प्रवास करावा किंवा आपल्या मुलांसोबत चालावे. ही जाहीर तळमळ वन विभाग, जुन्नर यांनी व्यक्त केली आहे.













