जुन्नर वन विभागाने बिबट्याच्या वाढत्या संख्येमुळे घेतला महत्त्वपूर्ण निर्णय: मेंढपाळाना सोलर लॅम्प आणि टेंटचे वाटप
ओतूर: जुन्नर वन विभागाच्या अंतर्गत ओतूर आणि उदापूर येथे बिबट्याच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांना बिबट्यापासून संरक्षण देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. घरांच्या आजूबाजूला सौर कुंपण लावून तातडीच्या सुरक्षा पावलांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून ओतूर आणि उदापूर येथे 40 मेंढपाळांना सोलर लॅम्प आणि टेंटचे वाटप करण्यात आले आहे. सोलर लॅम्प आणि टेंट बिबट्याच्या हल्ल्यापासून, सर्पदंशापासून, तसेच पाऊस आणि थंडीपासून संरक्षण मिळवण्यात मदत करणार आहेत.
8 जानेवारीला दिलेल्या सोलर लॅम्प आणि टेंटचे लाभार्थी
राजेंद्र बाळू कोळपे, ज्ञानेश्वर दिनकर डुबे, नितीन भाऊसाहेब चितळकर, बबन बाळू दुबे, कोंडाजी दगडू खामगळ, राहुल बिरु बरकडे, बाबुराव उदा बरकडे, योगेश भाऊसाहेब कोळपे, राजेंद्र बाळू कोळपे, ज्ञानेश्वर दिनकर डुबे, नितीन भाऊसाहेब चितळकर, बबन बाळू दुबे, कोंडाजी दगडू खामगळ, राहुल बिरु बरकडे, बाबुराव उदा बरकडे, योगेश भाऊसाहेब कोळपे,अविनाश वामन घोगरे, निलेश रामदास पानसरे, सोपान खंडू चितळकर, सुखदेव शिवाजी मोरे, बबन विष्णू कारंडे, धुळा बबन बरकडे, गणेश चिंधू माने, पंकज अशोक डोळझाके, दीपक नाना शेंडगे,
हे देखील वाचा: ओतूरमध्ये कारच्या धडकेत बाईकस्वाराचा मृत्यू; एक गंभीर जखमी
बबन बाळू भांड, देवराम छबू काळे, सुभाष धोंडीबा चितळकर, राहुल खंडू चितळकर, भीमा भिका चितळकर,संजय दगडू खामगळ, महादू रामदास खेमनर, संदीप मानकू कोकरे, लक्ष्मण गणपत विचकुले, संतोष बाळू तांबे, नामदेव महादू तांबे, सोन्याबापू काळूराम घुले, सदा बाळू तांबे, मालू गोपीनाथ कारगळ, आदेश भीमा करगळ, गणेश काळुराम कोकरे, भीमा गोपीनाथ कारगळ,संतोष साळवा बाचकर, अंकुश रामदास पोकळे, पांडुरंग बुधा बरकडे डिंगोरे, ओतूर,आळु, मांदारणे, उदापूर येथील रहिवासी आहेत व हे सर्व सोलर लॅम्प आणि टेंटचे लाभार्थी आहेत.
वन विभागाची महत्वपूर्ण कामगिरी
वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर यांनी सांगितले की सोलर लॅम्प आणि टेंटचा वापर मेंढपाळांना बिबट्याच्या हल्ल्यापासून, सर्पदंशापासून, तसेच पाऊस आणि थंडीपासून संरक्षण मिळवण्यात मदत करणार आहे. उपवनसंरक्षक अमोल सतपुते यांच्या आदेशानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर लहू ठोकळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी सोलर लॅम्पचा वापर कसा करावा आणि टेंट कसा लावावा याचे प्रात्यक्षिकही करण्यात आले. यावेळी एस.एम. बुट्टे वनपाल ओतूर, वनरक्षक ओतूर विश्वनाथ बेले आणि वनरक्षक उदापूर दादाभाऊ साबळे यांसह निकिता बोटकर (परिविक्षाधीन अधिकारी), वन कर्मचारी किसन केदार, फुलचंद खंडागळे, गणपत केदार व गंगाराम जाधव आदी उपस्थित होते.












