फास्टॅग अनिवार्य: या तारखेपासून लागू; सर्व वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी
मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात चारचाकी वाहनधारकांसाठी १ एप्रिलपासून फास्टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याचे सांगितले आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
हा निर्णय १ एप्रिल २०२५ पासून लागू होईल. या निर्णयामुळे ट्रॅफिक जॅम टाळण्यासोबतच इंधन आणि वेळेचीही बचत होईल.
हे देखील वाचा: कोरठण खंडोबा देवस्थानच्या भक्तांच्या भावना दुखावल्या; शालिनी घुले यांचे विधान
जर फास्टॅग काम करत नसेल तर वाहनधारकांना रस्ताशुल्क दुप्पट द्यावे लागेल. त्याचप्रमाणे, जर रस्ताशुल्काचे रोख, स्मार्ट कार्ड, क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा क्यूआर कोड किंवा अन्य माध्यमातून पेमेंट करायचे असेल तरही दुप्पट शुल्क द्यावे लागेल.
राज्यात एमएसआरडीसीचे ५० टोल बूथ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे २३ टोल बूथ आहेत. उपमुख्यमंत्री यांनी सांगितले की, हा निर्णय या नाक्यांवरही लागू केला जाईल.












