नायगाव: बिबट्याच्या हल्ल्यात पाच बकऱ्यांचा मृत्यू; उरुळी कांचन परिसरात भीतीचे वातावरण , ग्रामस्थ चिंताग्रस्त
उरुळी कांचन: नायगाव (ता. हवेली) येथे सहा फूट उंच लोखंडी कुंपण ओलांडून बिबट्या हल्ल्यात पाच बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन बोकड आणि दोन शेळ्यांचा समाविष्ट आहेत. या घटनेत नायगावचे शेतकरी गुलाब महादू चौधरी यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी (५) मध्यरात्री घडली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबट्यापासून संरक्षणासाठी चौधरी यांनी कंपनीजवळ तार लावून सहा फूट उंचीचे कुंपण उभारले आहे. मात्र, बिबट्याने या सहा फूट उंचीच्या कुंपणावरून उडी मारली आणि चौधरी यांच्या गाईच्या गोठ्यात पाच बकऱ्यांवर हल्ला केला, त्यानंतर बिबट्या निघून गेला.
हे देखील वाचा: ट्रेनच्या इंजिनवर झोपलेल्या युवकाचा धोकादायक प्रवास; तो व्हिडिओ नक्की पहा
दरम्यान, कंपनीत काम करणाऱ्या मजुरांनी सोमवारी (६) सकाळी चौधरी यांना या घटनेची माहिती दिली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि शेतकरी बिबट्याच्या संरक्षणाची मागणी करू लागले आहेत. चौधरी यांनी सांगितले की, ही माहिती वन विभागाला दिली आहे.
स्थानिकांच्या प्रतिक्रिया
नायगावचे माजी सरपंच गणेश चौधरी यांनी या बाबत सांगितले की, “नायगाव परिसरात बिबट्याचा मुक्त फिरणे वाढले आहे आणि सायंकाळच्या वेळी लोकवस्तीमध्येही बिबट्याची दर्शन नित्याचे झाले आहे.” त्यांनी वन विभागाने पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.












