सावित्रीमाई फुले जयंती: पिंपळवंडी ग्रामपंचायत आणि दशरथ फुलसुंदर यांचा महत्त्वपूर्ण उपक्रम; सावित्रीमाई फुले जयंतीचे औचित्य
पिंपळवंडी: क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पिंपळवंडी ग्रामपंचायत सभागृहात गावच्या सरपंच सौ. मेघाताई काकडे यांच्या हस्ते दहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थिनीचा सन्मान करण्यात आला. पिंपळवंडी गावातील सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुलसुंदर यांच्या वतीने पाचशे रुपयांचे मानधन कुमारी महेक सिराज तांबोळी हिला देण्यात आले, जिने यावर्षी ९५ टक्के गुण मिळवले आहेत.
मागील वर्षी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दशरथ फुलसुंदर यांनी घोषणा केली होती की, पिंपळवंडी गावातील इयत्ता १० वी मध्ये प्रथम येणाऱ्या मुलीला पाचशे रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देण्यात येईल. त्या वचनानुसार त्यांनी यावर्षीही हा उपक्रम राबवला आणि तो पुढे चालू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.
हे देखील वाचा: सावित्रीबाई फुले जयंती: गणेश फुलसुंदर यांचा सामाजिक उपक्रम
या कार्यक्रमास पिंपळवंडी गावच्या लोकनियुक्त प्रथम महिला सरपंच सौ. मेघाताई काकडे, बसपा पुणे जिल्हा संघटक श्रीकांतजी कसबे, अफजल शेख, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची उजळणी करण्यात आली आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे विचार मांडण्यात आले.













