जयहिंदमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिवस सप्ताहाची धडाकेबाज सुरुवात
जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालयात ग्राहक पंचायत संस्था पुणे,तालुका जुन्नर व अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग व तहसील कार्यालय जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिवस सप्ताहाचा शुभारंभ तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांनी केला. त्यांनी अशी भावना व्यक्त केले की आजच्या वस्तू आणि सेवांच्या जागतिकीकरणाच्या युगात ग्राहक म्हणून टिकून राहण्यासाठी निवारणाचे अधिकार, शिक्षणाचे अधिकार, अधिक संघटन, जागरूकता आणि संपूर्णतेची आवश्यकता आहे. कार्यक्रमात भाग घेतलेल्या आदरणीय नागरिकांनी, ग्राहक पंचायत संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी, स्वयंसेवकांनी आणि अंगणवाडी सेविकांनी व विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी नारायणगाव आगार येथील व्यवस्थापक वसंत आरगडे, ग्राहक संघ पुणे जिल्हा राज्य अध्यक्ष अशोक भोरडे, अरुण कुमार मोटे, योगेश शेंडे, जुन्नरचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप मोरे, विस्तार अधिकारी शांताराम धेंडे, रेशनिंग दुकानदार संघाचे अध्यक्ष सुनील गुंजाळ, जुन्नर वन अधिकारी रमेश खरमाळे आणि संस्थेचे प्रमुख डॉ. डी. एस. गल्हे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जे. गरकल उपस्थित होते.
हे देखील वाचा: थेऊर फाटा दुर्घटना: दुचाकी घुसली उभ्या ट्रकखाली; चालक गंभीर अवस्थेत
कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानेश कुलकर्णी आणि जुन्नर पुरवठा निरीक्षण अधिकारी दीपक मडके यांनी केले होते. योजना प्रथम वर्षाचे समन्वयक प्रा.घोलप व्ही. जे. आणि प्रथम वर्षातील शिक्षण-शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. गाडेकर आर. एक. यांनी समन्वयन केले.











