जुन्नर:- सध्या बेरोजगारीमुळे तरुण चोरांची संख्या वाढत आहे. जुन्नरजवळ पिंपळगाव सिद्धनाथ येथील एका शेतकऱ्याच्या सात पोती सोयाबीन चोरणाऱ्या जुन्नरमधील तीन चोरांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्यांना चोरीच्या सामानासह अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या लोकांची नावे सुयश सुनील जाधव (वय 20), विनायक सखाराम खुटाल (वय 23), करण अनिल पंडित (वय 21, रा. जुन्नर) अशी आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पवार करत आहेत.












