सासवड: खंडोबा नगरात भीषण आग; घरं जळाली, तीन कुटुंबांचं जीवन उद्ध्वस्त
सासवड: सासवड (पुरंदर) खंडोबा नगर येथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे. ही घटना आज सकाळी सुमारे ४ वाजता घडली. या आगीत बाबूराव साहेबराव जाधव, प्रकाश साहेबराव जाधव, अशोक साहेबराव जाधव यांच्या तीन घरं जळून खाक झाली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, आग सिलेंडर फुटल्यामुळे लागली आहे.
घरातील मुलांनी वेळेवर घराबाहेर पळ काढल्याने एक मोठा अनर्थ टळला आहे. या दरम्यान, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही पण जाधव कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. घटना कळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरातील सर्व सामान जळून खाक झाले आहे.
हे देखील वाचा: आमदार माऊली कटके यांची यशवंत व घोडगंगा कारखान्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी
ज्यांच्या घरांना आग लागली ते नागरिक डोंबारी समाजातील आहेत आणि सकाळी लग्न समारंभ, कामकाज इत्यादीसाठी बाहेर जातात. त्यामुळे संध्याकाळी काम संपवून परत येतात. ते दैनंदिन मजुरी करून आपले जीवन जगतात. या दरम्यान त्यांच्या घरातील सर्व सामान जळून खाक झाले आहे आणि आता त्यांच्याकडे राहण्यासाठी कोणतेही घर नाही. त्यामुळे त्यांच्या समोर उपासमारीची वेळ आली आहे.











