समर्थ इन्स्टिट्यूट: नर्सिंग हे मानवतेच्या सेवेसाठी उत्कृष्ट क्षेत्र- डॉ. वेठेकर
बेल्हे: समर्थ ग्रामीण शैक्षणिक संस्था संचालित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, कॉलेज ऑफ नर्सिंग, बेल्हे यांनी नवीन शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला शपथविधी समारंभ आयोजित केला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संचालिका व माजी जिल्हा परिषदेचे सदस्या स्नेहल शेळके, डॉ. मनोज वेठेकरयांच्या शुभहस्ते करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगचे प्राचार्य लवीना कदम, समर्थ आयुर्वेदिक रुग्णालयाचे डॉ. रमेश पाडेकर, डॉ. राजेंद्र निचित, यशवंत फापाळे, बीसीएस कॉलेजचे प्राचार्य डॉ. उत्तम शेलार, डॉ. लक्ष्मण घोलप, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संतोष घुले, रिसर्च इनोव्हेशन व इंटरनॅशनलायझेशन सेल चे डॉ. प्रतिक मुणगेकर, समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले, ज्युनियर कॉलेज प्राचार्य वैशाली आहेर, समर्थ गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे, समर्थ आयटीआयचे विष्णू मापारी, समर्थ लॉ कॉलेजचे शिवाजी कुमकर, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदिप गाडेकर तसेच सर्व नर्सिंग व रुग्णालय कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने करण्यात आली. मनोज वेठेकर व इतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. दीपप्रज्वलनानंतर नर्सिंग विद्यार्थिनींनी हातात मेणबत्त्या घेऊन अनुशासित पद्धतीने मार्च केला.
हे देखील वाचा: नेहरकरवाडी, येडगाव येथे 2 दिवसीय जय हनुमान उत्सव व प्राणप्रतिष्ठा सोहळा
मुख्य अतिथी डॉ. मनोज वेठेकरयांनी प्रथम वर्षाच्या नर्सिंग विद्यार्थिनींना नर्सिंग व्यवसायाचे उदात्त मूल्ये जपण्याची शपथ दिली. रुग्णाची काळजी घेण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याची, नैतिक मूल्यांचे पालन करण्याची, करुणेसह सेवा पुरविण्याची आणि आपल्या क्षेत्रात उत्कृष्टता साधण्यासाठी आवश्यक असलेल्या सतत शिक्षणासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा घेतली. डॉ. मनोज वेठेकर यांनी विद्यार्थिनींचे मार्गदर्शन करताना उच्च मानक राखण्यासाठी सतत संशोधन कार्यात पुढे जाण्याचे आणि आरोग्य सेवा सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
डॉ. वेठेकर म्हणाले, विद्यार्थिनींनी नेहमी करुणा, व्यावसायिकता आणि सत्यनिष्ठेसह वागावे. नर्सिंग हे फक्त करियर नाही तर काळजी आणि निष्ठेसह मानवतेची सेवा करण्याची एक महान संधी आहे. रुग्णांना उत्तम काळजी देण्यासाठी करुणा, निष्ठा आणि क्षमतेचे महत्व अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थिनींना सदैव शिकत राहण्याचे आणि आपली गुणवत्ता वाढवत राहण्याचे आवाहन केले.
प्राचार्य लवीना कदम म्हणाल्या की, फ्लॉरेन्स नाईटिंगे यांनी नर्सिंग व्यवसायाचे महत्व ओळखले आणि आपले जीवन त्यासाठी समर्पित केले. आम्ही या नर्सिंग कॉलेजमध्ये सर्वोत्तम नर्सेस तयार करण्यासाठी कटिबद्ध आहोत. नवीन पिढीत परोपकारी भावना वाढवून रुग्णांची सेवा करण्याची प्रवृत्ती वाढवावी असेही त्या म्हणाल्या.
डॉ. प्रतीक मुंगेकर यांनी देखील नर्सिंग विद्यार्थिनींना सदैव समर्पित भावनेने रुग्णांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. आयेशा जमादार, प्रा. हर्षदा गोफणे यांनी विशेष प्रयत्न केले. डॉ. विजय हांडे, डॉ. मीनाक्षी तोरणे, डॉ. तृप्ती टिपले, पल्लवी उचाळे, वैशाली कणसे, ज्योती शहापूरकर, ऋतुजा बांगर, रजनी घाडगे, वर्षा गुंजाळ, प्रणिता गगे,सुलताना पटेल, प्रज्ञा गायकवाड, पल्लवी बांगर या नर्सिंग स्टाफने कार्यक्रमाची शोभा वाढवली.हर्षदा गोफाने यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार प्रा. आयेशा जमादार यांनी मानले.











